Home नंदुरबार जिल्हा संपूर्णता अभियान सन्मान समारोह – नंदुरबार जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी आणि फील्ड टीमचा...

संपूर्णता अभियान सन्मान समारोह – नंदुरबार जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी आणि फील्ड टीमचा सत्कार

Sampoornata Abhiyan Honor Ceremony – Honoring the officers, employees and field team of Nandurbar district

नंदुरबार | 31 जुलै 2025

ऑगस्ट 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत नीती आयोगाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियान, अंतर्गत Aspirational District Program (ADP) व Aspirational Block Program (ABP) मध्ये जिल्ह्याने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत देशात आपला ठसा उमटवला आहे. मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांच्या समन्वयातून व जिल्हा प्रशासनाच्या उत्कृष्ट योगदानामुळे हे यश मिळाले आहे.

संपूर्णता अभियान अंतर्गत मुख्य इंडिकेटर्स:

ABP अंतर्गत:

⦁ गरोदर महिलांची पहिल्या तिमाहीतील नोंदणी

⦁ डायबेटिस व हायपरटेंशन स्क्रीनिंग

⦁ मातांना पूरक पोषण आहार

⦁ माती परीक्षण पत्रिका (Soil Health Card)

⦁ बचत गटांना RF निधी

ADP अंतर्गत:

⦁ लसीकरण, पोषण आहार, शालेय वीज व पुस्तक वितरण

⦁ ICDS व शिक्षण विभागातील 3 इंडिकेटर्स पुणे कार्यक्रमात ‘सॅचुरेट’

तालुकानिहाय यश:

⦁ अक्राणी तालुक्यात 4 इंडिकेटर्स,

⦁ अक्कलकुवा व नवापूर – प्रत्येकी 1 इंडिकेटर,

⦁ ADP अंतर्गत एकूण 3 सूचकांक सॅचुरेट

गौरवीत अधिकारी/कर्मचारी (प्रातिनिधिक उल्लेख):

⦁ BDO: श्री. देविदास देवरे (नवापूर), श्री. लालू पावरा (अक्कलकुवा), श्री. मनोज भोसले (धडगाव), श्री. राजू किर्वे (तळोदा), श्री. काशिनाथ पवार ABDO (तळोदा)

⦁ Taluka Health Officer: डॉ. अविनाश मावची, डॉ. दिनेश वळवी, डॉ. कांतीलाल पावरा, डॉ. तृप्ती पटले

⦁ Child Development Project Officers: श्री. नरेश आहिरराव, सौ. अर्चना पाडवी, सौ. अश्विनी करंके, सौ. आशा पराडके, श्री. सागर वाघ

या यशस्वी कामगिरीमागे महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य व महिला बालविकास विभागातील आंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कृषी अधिकारी, बीएमएम, एएनएम, CRP, क्लस्टर कोऑर्डिनेटर, फेलोज इ. यांचा प्रमाणपत्र देवून जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला.

डॉ. मित्ताली सेठी यांचे मार्गदर्शन:

“तुमच्या अथक परिश्रमामुळे जिल्ह्याने राज्यस्तरीय स्तरावर मान मिळवला आहे. तुमच्यासारखी मनापासून काम करणारी टीम असणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. ‘हा तुमचा जिल्हा आहे’, त्यामुळे तुम्ही पहिल्या पंक्तीतील Stakeholder आहात. तुमच्या कल्पना मनमोकळेपणे सुचवा, आम्ही प्रयत्न करू की प्रशासन संवेदनशील पद्धतीने तुमच्यासोबत काम करेल.”

त्यांनी आगामी काळात KPMG सोबत सुरू होणाऱ्या नव्या प्रकल्पाची माहिती दिली, ज्यात प्रत्येक तालुक्यात कम्युनिकेशन व वाहतूक सुलभता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

उपस्थित मान्यवर:

⦁ मा. अंजली शर्मा (IAS) – SDO, नंदुरबार

⦁ श्री. कृष्णकांत कंवरिया – SDO, शहादा

⦁ श्री. अनय नावंदर (IAS) – SDO, तळोदा

⦁ मा. सावन कुमार (IAS) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार

⦁ मा. संतोष बोदडे – सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, नंदुरबार

या उपक्रमामुळे नंदुरबार जिल्हा सामाजिक, आरोग्य, पोषण आणि शिक्षण क्षेत्रात ‘परिणामकारक प्रशासन’ या निकषावर आदर्श ठरत आहे. ही केवळ एक प्रशासकीय उपलब्धी नसून, नागरिकांच्या जीवनातील सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे.

#districtadministrationnandurbar

#SampannataAbhiyan#nandurbarsuccess#ADP#ABP#mitalisethiias#nandurbardevelopment#teameffort#districtofimpact#StakeholderDrivenGovernance

error: Content is protected !!
Exit mobile version