Home शैक्षणिक शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राची कन्या कु. श्रावणी कृष्णा कुदळे...

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राची कन्या कु. श्रावणी कृष्णा कुदळे हिने NEET (नीट) परीक्षेत मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल तीचे अभिनंदन केले

1
School Education Minister Dadaji Bhuse congratulated Shravani Krishna Kudale, a daughter of Maharashtra, on her unprecedented success in the NEET examination.

मंत्री दादाजी भुसे यांनी म्हटले आहे की, विशेष कौतुकाची आणि शिक्षण मंत्री म्हणून माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे, श्रावणीचे पहिली ते पाचवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण दौंड तालुक्यातील ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोपाळवाडी (चोरमले वस्ती)’ येथे झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊनही केवळ जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर एवढे मोठे यश मिळवता येते, हे श्रावणीने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. यातून आपल्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

श्रावणीला तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षण आणि भावी वाटचालीसाठी शालेय शिक्षण विभाग आणि राज्य शासनाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.

#श्रावणीकुदळे