Home नंदुरबार कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय टोकर तलाव येथे शालेय गणवेश वाटप उत्साहात

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय टोकर तलाव येथे शालेय गणवेश वाटप उत्साहात

0
School uniforms distributed with enthusiasm at Kasturba Gandhi Balika Vidyalaya, Tokar Talav.

नंदुरबार(प्रतिनिधी):-टोकरतलाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात विद्यार्थिनींना शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार जिल्हा शिवसेना अध्यक्ष तथा युवा नेते ऍडव्होकेट राम रघुवंशी यांच्या सौभाग्यवती मेघा राम रघुवंशी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती शालिनी पाटील यांनी केले. तसेच यावेळी प्रमुख अतिथींनी विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे, मन लावून अभ्यास करण्याचे तसेच उज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्मिता सुरेश चव्हाण यांनी केले असून आभार श्रीमती पूजा रमेश चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयाच्या शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात संपन्न झाला.