(अक्कलकुवा) नुकताच ७७ व्या स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. परंतु,आजही मूलभूत सुविधेअभावी व संबंधित प्रशासनाचा दुर्लक्षतेमुळे आश्रम शाळेत शिकणाऱ्या विदयार्थ्यांचे दुर्दैवी मृत्यू होतात.काही दिवसांपूर्वी शासकीय आश्रम शाळा तोरणमाळ ता.धडगांव येथे एका पहिलीत शिकणाऱ्या विदयार्थ्यांच्या मृत्यू झाला.आज दि.१६ रोजी शासकीय आश्रम शाळा कुंभारखान ता.अक्कलकुवा येथील पहिलीत शिकणारा सागर उत्तम वसावे या विदयार्थ्यांचा पहाटे प्राथमिक आरोग्य केंद्र अक्कलकुवा येथे आणल्यानंतर काही मिनिटांत दुर्दैवी मृत्यू झाला. (Second death in 5 days at Govt Ashram School-Birsa fighters warn of agitation)
संबंधित घटनेची माहिती मिळताच बिरसा फायटर्स टीमने प्राथमिक आरोग्य केंद्र अक्कलकुवा येथे जाऊन माहिती घेतली.आश्रम शाळेतील वाढते विद्यार्थी मृत्यू चिंताजनक आहे.संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष,अनेक शाळेत मुख्याध्यापक व अधीक्षकांची जबाबदारी एकावर,वारंवार मागणी करून रिक्त जागा भरल्या जात नाहीत,अधीक्षकांना स्थानिक ठिकाणी राहणे बंधनकारक करणे,आरोग्य तपासणी,बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे,चांगला आहार याबाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बिरसा फायटर्स संघटनेच्या पदाधिकारी यांनी आश्रम शाळेतील वाढते मृत्यू,रिक्त पदभरती,आश्रम शाळेतील गंभीर समस्याबाबत प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी तळोदा यांच्याची संपर्क केला.उद्याच सर्व मुख्याध्यापकांची मिटिंग घेऊन योग्य ते उपाययोजना करण्याचे सांगितले.या विषयासंबंधी बोलण्यासाठी बिरसा फायटर्स संघटनेच्या पदाधिकारी यांनी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांना संपर्क देखील केला.मात्र,संपर्क होऊ शकला नाही.आश्रम शाळेतील प्रश्नांबाबत गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करा.अन्यथा,लवकरच आंदोलन करण्याचा इशारा बिरसा फायटर्सने दिला आहे.