
( नंदुरबार) शिक्षण, वाचनसंस्कृती आणि सामाजिक परिवर्तनाला चालना देण्यासाठी वाघाळे ग्रामपंचायतीत आज “जननायक वीर बिरसा मुंडा वाचनालय” चे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमास तहसीलदार श्री. प्रदीप पवार, गटविकास अधिकारी श्री. बिराडे, तालुका कृषी अधिकारी श्री. राजपूत तसेच स्थानिक जनप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, गावातील मान्यवर नागरिक, महिला मंडळ, विद्यार्थी, आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामपंचायतीच्यावतीने मा. जिल्हाधिकारी महोदयांचे पारंपरिक स्वागत करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांनी गावातील वाचन संस्कृती वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “वाचनालय हे गावाच्या प्रगतीचे केंद्र असते. शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे, आणि ग्रामीण भागात वाचन संस्कृती जोपासल्यास युवकांना नवी दिशा मिळेल.”
त्यांनी तरुणांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आणि या वाचनालयाचा उपयोग समाजविकासासाठी करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी गावातील विद्यार्थी, महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांनी “जननायक वीर बिरसा मुंडा” यांच्या जीवनावर आधारित पुस्तके व विचारसरणीचा अभ्यास करण्याचा संकल्प केला.
वाचनालयामध्ये विविध विषयांवरील शैक्षणिक, प्रेरणादायी आणि स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच डिजिटल लायब्ररी प्रणालीसाठी आवश्यक नियोजनही करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवकांनी केले, तर आभारप्रदर्शन ग्रामपंचायत सदस्यांनी केले.
ही लोकार्पण सोहळा ग्रामविकास, शिक्षण आणि जनजागृती या तिन्ही क्षेत्रांत प्रेरणादायी ठरला असून, वाघाळे ग्रामपंचायतने लोकशिक्षणाच्या दिशेने एक आदर्श पाऊल उचलले आहे.
#जननायकवीरबिरसामुंडा#वाचनालयलोकार्पण#जिल्हाधिकारीनंदुरबार#डॉमित्तालीसेठी#GramVikas#EducationForAll#DigitalLibrary#RuralDevelopment#GoodGovernance#TeamNandurbar#Waghale#NandurbarDistrict#YouthEmpowerment#BirsaMundaLibrary#KnowledgeForChange