Home नंदुरबार जिल्हा मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण: जिल्ह्यात 72.93 टक्के काम पूर्ण;’बीएलओ’ना सहकार्य करण्याचे...

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण: जिल्ह्यात 72.93 टक्के काम पूर्ण;’बीएलओ’ना सहकार्य करण्याचे आवाहन

1
Special Intensive Revision of Voter List: 72.93% of work completed in the district; appeal to cooperate with BLOs.

(नंदुरबार) भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार राज्यात ‘मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण अभियान (SIR)-2026’ वेगाने सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये या अभियानांतर्गत आतापर्यंत एकूण 72.93 टक्के काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कालावधीत संपूर्ण अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घरोघरी भेट देत असून, नागरिकांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 13 A व 13 ( मधील तरतुदींनुसार भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यासह देशातील 16 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे विशेष सखोल पुनरीक्षण अभियान घोषित केले आहे. सदर कार्यक्रम अत्यंत कालबद्ध स्वरूपाचा असून, सर्व प्रक्रिया मुदतीत पूर्ण करणे अनिवार्य आहे.

या अभियानांतर्गत दिनांक 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन 2 प्रतींमध्ये प्रगणना फॉर्म भरून घेणार आहेत व त्याचे डिजिटायझेशन करणार आहेत.

अल्प कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून व्यापक स्वरूपाचे काम बीएलओ यांना पूर्ण करायचे आहे. हे अभियान वेळेत पूर्ण होण्यासाठी स्थानिक स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, सर्व नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांनी घरोघरी भेटी, जनजागृती, आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी बीएलओंना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.