Home महाराष्ट्र ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष...

‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत

Special interview with State Election Commissioner Dinesh Waghmare in the ‘Jai Maharashtra’ and ‘Dilkhulaas’ programs

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दूरदर्शनवरील ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता; तसेच आकाशवाणीवरील ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 12, 13, 14 व 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.25 वाजता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

निवेदक मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली असून, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरदेखील उपलब्ध होईल. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातील मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल; तसेच ‘News on AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध असेल.

राज्यातील स्थानिक स्वराज्‍य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. पहिल्या टप्प्यात 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त, वाघमारे यांच्याशी या मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत समाजमाध्यम हँडल्स्‌

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

error: Content is protected !!
Exit mobile version