Home महाराष्ट्र राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा २०२६ बैठक

राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा २०२६ बैठक

State Level Kharif Season Review 2026 Meeting

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा २०२६ बैठक पार पडली. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामे आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री जयकुमार रावल, मंत्री मकरंद जाधव-पाटील, मंत्री डॉ. अशोक वुईके, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित होते.

यावेळी विविध विभागांचे मंत्री, राज्यातील सर्व पालकमंत्री, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्यासह, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते

error: Content is protected !!
Exit mobile version