Home नंदुरबार जिल्हा तंत्रज्ञानाच्या मदतीने माता व बाल आरोग्य सेवांना बळ

तंत्रज्ञानाच्या मदतीने माता व बाल आरोग्य सेवांना बळ

Strengthening maternal and child health services with the help of technology

नंदुरबार जिल्ह्यातील माता व बाल आरोग्य सेवा अधिक प्रभावी, तंत्रज्ञानाधारित आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने आज याहा मोगी सभागृह, जिल्हा परिषद नंदुरबार येथे e-SUCHI प्रणाली अंतर्गत कुटुंब नियोजन सर्वेक्षण, माता आरोग्य मॉड्युल तसेच Health Action Centre अंतर्गत उच्च जोखीम गरोदर माता व उच्च जोखीम बालकांच्या ट्रॅकिंग संदर्भात प्रशिक्षण व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

सदर बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सेवांशी संबंधित विविध महत्त्वाच्या व तातडीच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः उच्च जोखीम गरोदर माता आणि उच्च जोखीम बालकांची वेळेत ओळख, नियमित फॉलोअप, आरोग्य तपासणी आणि त्वरित उपचार यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात आला.

e-SUCHI प्रणालीच्या माध्यमातून कुटुंब नियोजन सर्वेक्षण, माता आरोग्य नोंदी आणि लाभार्थ्यांचे डिजिटल ट्रॅकिंग अधिक सक्षम करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आरोग्य नियंत्रण कक्ष (Health Action Centre) मार्फत जिल्हास्तरावरून नियमित मॉनिटरिंग करून आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. आरोग्य सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून माता व बाल मृत्यू दर कमी करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, प्रत्येक माता आणि बालक सुरक्षित व निरोगी राहावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

#eSUCHI#HealthActionCentre#माताआरोग्य#बालआरोग्य#डॉमित्तालीसेठी#नंदुरबार#आरोग्यविभाग#HighRiskPregnancy#ChildHealth#DigitalHealth#PublicHealth#Nandurbar#TribalHealth#SafeMotherhood#Healthcare

error: Content is protected !!
Exit mobile version