Home तळोदा दुर्गम पाड्यांना जोडणारे विकासाचे मजबूत पूल!

दुर्गम पाड्यांना जोडणारे विकासाचे मजबूत पूल!

1
Strong bridges of development connecting remote hamlets!

(तळोदा) दुर्गम भागातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तळोदा तालुक्यातील मोकससमाळ आणि मोठीबारी येथील दोन महत्त्वपूर्ण साकव पुलांचे उद्घाटन मा. आमदार राजेशदादा पाडवी तसेच जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत उभारण्यात आलेल्या या साकव पुलांमुळे दुर्गम पाडे आणि मुख्य गावांमधील दळणवळण अधिक सुरक्षित, सुलभ आणि अखंड होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे संपर्क तुटण्याची समस्या कायमची दूर होण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत जाणे,

रुग्णांना आरोग्य सेवांपर्यंत पोहोचणे,

शेतकऱ्यांना बाजारपेठेशी संपर्क साधणे,

नागरिकांना दैनंदिन कामांसाठी प्रवास करणे

आता अधिक सुरक्षित आणि सोयीचे होणार आहे.

या पुलांमुळे केवळ दोन ठिकाणे जोडली गेली नाहीत, तर विकास, सुविधा आणि संधींचे नवे दरवाजेही खुले झाले आहेत. आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणारा हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, उपविभागीय अधिकारी जी. एस. गावित, उपविभागातील सर्व शाखा अभियंते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साकव पूल म्हणजे केवळ बांधकाम नव्हे, तर दुर्गम भागातील नागरिकांच्या सुरक्षितता, सुविधा आणि विकासाला जोडणारा विश्वासाचा पूल आहे.

#Nandurbar#Taloda#RajeshPadavi#DrMittaliSethi#TribalDevelopment#InfrastructureDevelopment#BridgeInauguration#RuralConnectivity#ViksitNandurbar#PublicInfrastructure#Maharashtra#AdivasiVikas#NandurbarNews#DevelopmentWorks#JansamparkNandurbar