Home नंदुरबार जिल्हा राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा!

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा!

Submit a proposal for the State Government's Outstanding Journalism Award!

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, लेखन, छायाचित्रण, दूरचित्रवाणी वृत्तकथा, समाज माध्यमातील योगदान आणि स्वच्छता अभियानासाठी जनजागृतीपर लेखनासाठी 2024 साठीची पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी कालावधी:

कालावधीत प्रकाशित किंवा प्रसारित झालेल्या लेखन, छायाचित्रे आणि वृत्तकथांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

प्रवेशिका सादर करण्याचे ठिकाण:

स्पर्धकांनी अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, maharashtra.gov.in आणि mahasamvad.in या संकेतस्थळांवरून डाउनलोड करून, परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा माहिती कार्यालय, 206 नवीन प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे सादर करावेत.

पुरस्कार व स्वरूप:

राज्य व राष्ट्रीय स्तरावर दिले जाणारे प्रतिष्ठित पुरस्कार:

अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार: ₹1,00,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

यशवंतराव चव्हाण शासकीय गट पुरस्कार: ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार: ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार: ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (शासकीय गट): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

समाज माध्यम पुरस्कार: ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार: ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार: ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

विभागीय पुरस्कार:

राज्यातील विभागीय पुरस्कारांचे स्वरूप:

दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद व लातूर): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

नानासाहेब परुळेकर पुरस्कार (पुणे): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

शि. म. परांजपे पुरस्कार (कोकण): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

ग. गो. जाधव पुरस्कार (कोल्हापूर): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार (अमरावती): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत Ranjitsing Rajput यांचे आवाहन

“जिल्ह्यातील पत्रकार, आणि छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वेळेत प्रवेशिका सादर करणे महत्त्वाचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

स्पर्धकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हा! आपल्या कामगिरीला मिळवा राष्ट्रीय व राज्यस्तरीय बहुमान !

#पत्रकारिता_पुरस्कार#महाराष्ट्रशासन#ExcellenceInJournalism#JournalismAwards2024#DistrictInformationNandurbar

error: Content is protected !!
Exit mobile version