आज मा.जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिककेंद्री करण्यासाठी या बैठकीत अनेक ठोस निर्देश देण्यात आले.
बैठकीत मा.जिल्हाधिकारी यांनी पुढील महत्त्वाचे आदेश दिले :
दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व रास्तभाव दुकानांना 100% धान्य पोहोचवणे बंधनकारक.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थी दि. 25 तारखेपर्यंत धान्य उचलतात याची खात्री करून आवश्यक ती कार्यवाही करावी.
सलग 6 महिने धान्य न घेणाऱ्या Silent RC, मयत लाभार्थी, स्थलांतरित कुटुंब यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याचे काम वेगाने पूर्ण करावे.
यासंदर्भातील तालुकानिहाय मासिक अहवाल थेट मा. जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश.
तळोदा पुनर्वसित लाभार्थ्यांची शिधापत्रिका तातडीने हस्तांतरित करून अन्नधान्य वेळेत उपलब्ध करावे.
सिकल सेल ॲनिमिया ग्रस्त नागरिकांना अंत्योदय अन्न योजना लाभ मिळण्यासाठी त्यांची माहिती गोळा करून शिधापत्रिका तयार कराव्यात आणि लाभ त्वरित देण्यात यावा.
सर्व तालुक्यांत वर्षातून किमान दोन e-KYC कॅम्प आयोजित करावेत—
• आधार अद्ययावतीकरण
• शिधापत्रिका e-KYC
प्रत्येक शिधापत्रिकेत किमान एक मोबाईल क्रमांक लिंक असणे अनिवार्य.
या बैठकीस श्री. विशाल भगत, जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच जिल्हा पुरवठा कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी व सर्व तालुक्यांतील पुरवठा निरीक्षण अधिकारी उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा प्रशासनाने अन्न सुरक्षा योजनांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळावा यासाठी कटिबद्धतेचा पुनरुच्चार या बैठकीत केला.
#Nandurbar#FoodSecurity#PublicDistributionSystem#SupplyDepartment#AAY#NFSA#eKYC#DistrictAdministration#MitaliSethi#NandurbarUpdates
