(नंदुरबार) मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली Indian School of Business (ISB) यांच्या सहकार्याने वनविभागाची शाश्वत बांबू अर्थव्यवस्था विकास विषयक अत्यंत महत्त्वाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. वनसंपदा, ग्रामीण विकास आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संगम साधणाऱ्या या उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील CFR (Community Forest Rights) क्षेत्रामध्ये बांबू आधारित अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महिला FPO स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या FPO च्या माध्यमातून बांबूचा उपयोग मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि विविध बांबू उत्पादने तयार करून स्थानिक पातळीवर उत्पन्ननिर्मिती (Livelihood Generation) वाढवण्यासाठी करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी प्रायोगिक स्वरूपात 10 गावांमध्ये सुरू केली जाणार असून, हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर जिल्हाभर विस्ताराचा आराखडा आहे.
हा अभिनव प्रकल्प सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यातच राबविला जात असल्याने आदिवासी बहुल भागातील महिलांना स्वावलंबन, कौशल्य विकास आणि उद्योजकतेकडे जाणारा नवा मार्ग उपलब्ध होईल.
बैठकीस DCF, ACF, RFO तसेच ISB ची तज्ज्ञ टीम उपस्थित होती. सर्वांनी या उपक्रमासाठी संयुक्त नियोजन, तांत्रिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण समन्वय यावर भर दिला.
नंदुरबार जिल्ह्यात शाश्वत वनआधारित अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही सकारात्मक सुरुवात असून, बांबू उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक समुदायाच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
#Nandurbar#BambooEconomy#SustainableDevelopment#WomenFPO#ForestRights#LivelihoodGeneration#ISB#ForestDepartment#CommunityEmpowerment#NandurbarAdministration
