Home नंदुरबार जिल्हा स्वीप टीव्ही चॅनेल उत्तम संकल्पना – मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने निवडणूक...

स्वीप टीव्ही चॅनेल उत्तम संकल्पना – मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने निवडणूक प्रक्रियेतील प्रेरणादायी व्हिडिओंचे संकलन

SWEEP TV Channel Great Concept – Chief Election Observer Aditya Jeevane Collection of Inspiring Videos from the Election Process

​अहिल्यानगर: “सध्याचा जमाना रील आणि छोट्या व्हिडिओंचा आहे. याचा खूप मोठा परिणाम जनमानसावर होत असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एखादा काही सेकंदांचा व्हिडिओ मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. याची दखल घेऊन मनपा स्वीप समितीने राबवलेली ‘स्वीप टीव्ही चॅनेल’ ही संकल्पना उत्तम आहे. यामध्ये सोशल मीडियाचा चपखल व अचूक वापर दिसून येतो. हे टीव्ही चॅनेल प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवावे,” असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निरीक्षक आदित्य जीवने यांनी केले.

​मनपा निवडणुकीमध्ये मतदार जागृतीतून मतदानाची टक्केवारी वाढावी, या हेतूने मनपा स्वीप समितीने विविध स्पर्धांचे (उदा. रील-व्हिडिओ बनवा, मतदानासाठी आवाहन करणारे जीआयएफ बनवा) आयोजन केले होते. या स्पर्धेतील संकलित व्हिडिओ ‘स्वीप टीव्ही चॅनेल’ या यूट्यूब माध्यमावर अपलोड केले जातात, जेणेकरून सर्व व्हिडिओ एकाच ठिकाणी पाहता येतील. यातून मतदान करण्याविषयी सकारात्मक संदेश जात असल्याचे निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

​मतदारदूत डॉ. अमोल बागुल हे व्हिडिओ संकलित करून हे चॅनेल नियंत्रित करीत आहेत. ८०५५८०९३९४ या व्हॉट्सॲप क्रमांकावरून नागरिकांना या स्वीप टीव्ही चॅनेलच्या यूट्यूब लिंक मिळू शकतात.

​या उपक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंडे, स्वीप नोडल अधिकारी तथा साहाय्यक आयुक्त अशोक साबळे, साहाय्यक आयुक्त सपना वसावा, मेहेर लहारे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन आणि प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version