
क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात मलनिसा:रण योजनांच्या २७ गावांमधील १२०९.८ कोटींच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामांमुळे संबंधित गावातील ३९ लाख ४२ हजार लोकसंख्येला लाभ होणार आहे. सभेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
प्राधिकरणाकडे अग्निशमन सेवा शुल्कापोटी शिल्लक ३०० कोटी रुपयांचा निधीचा उपयोग पुणे महानगरात अग्नि प्रतिबंधक आराखड्यानुसार विविध उपाययोजनांसाठी करण्यात यावा. येथील नद्यांचे पुनरुज्जीवन करून त्यांचे प्रदूषण रोखावे. नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डीडी या महामार्गाच्या सेवा रस्त्याचे काम सुरू करावे, या पुलाजवळ सेवा रस्ते निर्माण करून अपघात रोखण्यासाठी अन्य पर्यायांचाही उपयोग करावा. प्राधिकरणाच्या ताब्यातील पुणे जिल्हा परिषदेचा सुविधा भूखंड जिल्हा परिषदेला देण्याबाबत भूखंड विकासाची व्यवहार्यता तपासून कार्यवाही करावी. माण – हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो लाईन तीनचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
सभेस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता,अपर मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता आदी उपस्थित होते. पुणे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी बैठकीत सादरीकरण केले. दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी उपस्थित होते.