
गरज ओळखून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित अजितदादा पवार कृषी समृद्धी योजनेचा शुभारंभ केला आहे. कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेती ही क्रांतिकारक चळवळ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीसाठी ५०० कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा दिवंगत अजितदादांनी दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात केली होती. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने नेहमीच प्राधान्य दिले आहे. कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत १ हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे. ही योजना ऊस शेतीमध्ये एआयचा वापर वाढविण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. यामुळे ऊस उत्पादनामध्ये ४० टक्के वाढ, पाण्याची ३० टक्के बचत व रासायनिक खतांचा वापर कमी होऊन शेतीचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. या तंत्रज्ञानाचा बारामतीमध्ये यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.
यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप वळसे पाटील, आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त संजय कोलते, बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे आदी उपस्थित होते.