
यावेळी अपर मुख्य सचिव बी वेणूगोपाल रेड्डी, राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उपसचिव अमोल मुत्याल, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार आदी उपस्थित होते.
आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ टिकेल का असा प्रश्न पडतो पण आजची तरुण मंडळी अधिक ग्रंथालयाकडे वळली आहे. विविध वाचन उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत, त्यासाठी ग्रंथालयांना पुस्तकांनी समृद्ध करावं, असे आवाहन करून ग्रंथालयांच्या अनुदानात 40 टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक आहे – चंद्रकांतदादा पाटील
राज्यातील जनतेचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी वाचन चळवळ अधिक समृद्ध केली पाहिजे. ज्या ग्रंथालयांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत त्यांच्या नवीन बांधकामांसाठी अनुदानात शासनाने वाढ करावी तसेच ग्रंथालयांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित पुस्तकांचा समावेश असावा. आणि पालकमंत्र्यांच्या निधीतील एक टक्के निधी ग्रंथालय चळवळीसाठी द्यावा – डॉ. नीलम गोऱ्हे