पुणे महानगरपालिकेच्यावतीने ‘छत्रपती संभाजी महाराज उद्यान’ येथे उभारण्यात आलेल्या बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपतीसंभाजीमहाराज
The Buddha Bhushan book, erected by the Pune Municipal Corporation at the 'Chhatrapati Sambhaji Maharaj Udyan', is dedicated to the author of the book, Chhatrapati Sambhaji Maharaj.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाविषयी…
छत्रपती संभाजी महाराज यांचे ‘बुधभूषण’ ग्रंथ रचतानाचे विश्वातील पहिले १० फुट उंचीचे पूर्णाकृती कांस्य शिल्प महाराष्ट्रात प्रथमच पुणे महानगरपालिकेच्यावतीने शिवाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे उभारण्यात आले आहे. या प्रकल्पास एकूण ५ कोटी रुपये इतका खर्च झालेला आहे.
‘बुधभूषण’ ग्रंथातील श्लोक निवडण्याकरिता इतिहास तज्ज्ञ, संस्कृत-मराठी भाषातज्ज्ञ, अभ्यासक यांच्या इतिहास तज्ज्ञ समितीमार्फत छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या संस्कृत ‘बुधभूषण’ ग्रंथामधून आवश्यक श्लोक निवडण्यात आलेले आहेत.
छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा व महाराजांनी रचलेल्या ९ निवडक श्लोक मराठी व इंग्रजी अर्थासह तसेच बुधभूषण ग्रंथाची संक्षिप्त माहिती देणाऱ्या भव्य १० दगडी भिंती प्रस्तावनेसह कोरण्यात आलेले आहेत.
शिल्पाच्या भोवती रंगीत कारंजे, तसेच संपूर्ण परिसरात विविध शोभीवंत फुलझाडे लावण्यासह विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.
अतिशय कठीण कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व जगासमोर आणण्यासाठी महानगर पालिकेच्यावतीने देदीप्यमान शिल्प उभारण्यात आले आहे. यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असून या ठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला महाराजांच्या गौरवशाली इतिहासापासून प्रेरणा मिळणार आहे