Home महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME)...

राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राची कार्यक्षमता

The efficiency of the Micro, Small and Medium Enterprises (MSME) sector, which contributes significantly to the economic development of the state

उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने Industry and Government Networking for Inclusive Transformation and Empowerment (IGNITE–2026) या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई शहर अपर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे करण्यात आले. कार्यशाळेला उद्योग सह संचालक श्रीमती विजू सिरसाठ, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री, एसईपीसीचे प्रतिनिधी विवेक बक्षी, एफआयईओ च्या श्रीमती रिषु मिश्रा, IDBI Capital चे विक्रम जैन, सीप्झ संस्थेच्या श्रीमती शामली बॅनर्जी यांच्यासह विविध क्षेत्रांतील सुमारे १८० प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी उद्योग सह संचालक विजू सिरसाठ यांनी मुंबईतील उद्योजकीय वातावरण वृद्धिंगत करण्यासाठी इग्नाईट कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली. निर्यात धोरण, डिस्ट्रिक्ट अ‍ॅज एक्स्पोर्ट हब, नवीन औद्योगिक धोरण तसेच उद्योग विभागाच्या विविध पुढाकारांची माहिती उपस्थित उद्योजकांना देण्यात आली. एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) उपक्रमांतर्गत मुंबई उपनगरासाठी जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी तर मुंबई शहरासाठी लेदर उत्पादनांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version