
‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन करत दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण केल्या असून, याबाबत केंद्र सरकारसह देश-विदेशातील सायकलपटूंनी समाधान व्यक्त केले आहे. या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
जागतिक पातळीवरील खेळाडूंना एकत्र आणून क्रीडा पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. भारत क्रीडा पर्यटनाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काढले. यावेळी अभिनेता अमीर खान यांनीही ‘पुणे ग्रँड टूर’च्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.