Home टेक न्युज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले

0
The first phase of Prime Focus's world-class, state-of-the-art studio in the Film City complex was inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis.

भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र बनविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरातील प्राइम फोकसच्या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून, मुंबई सर्जनशील उद्योगांचे जागतिक केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमापूर्वी फिल्मसिटीच्या प्रशासकीय कार्यालय परिसरातील भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाअंतर्गत केले.

शासनाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य केले. ‘वेव्ह्ज २०२५’ परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या एका वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला, ही उल्लेखनीय बाब आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहासामध्ये दडलेल्या असंख्य प्रेरणादायी कथा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सक्षम सर्जनशील परिसंस्थेची गरज आहे. प्राइम फोकसची ही सुविधा त्या दृष्टीने देशासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. जगातील सर्वात मोठ्या चित्रपट सहनिर्मिती प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची निर्मिती या स्टुडिओमध्ये होत आहे. भारतीय सर्जनशीलतेचा जागतिक स्तरावरील उत्कृष्ट नमुना म्हणून हा चित्रपट ओळखला जाईल. युवा पिढीच्या सर्जनशील क्षमतेला वाव देणे, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे आणि मनोरंजन उद्योगासाठी सक्षम परिसंस्था उभारणे यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संस्कृती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा प्रभावी संगम या प्रकल्पातून साकार झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘ऑरेंज इकॉनॉमी’च्या संकल्पनेला प्राइम फोकसने प्रत्यक्ष आकार देण्याचे काम केले आहे – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रपट नगरी (फिल्मसिटी) च्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे – पाटील तसेच प्राइम फोकस समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते.