Home महाराष्ट्र सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला राजाराम पुलापासून ते फन टाईम थिएटरपर्यंतचा उड्डाणपूल नागरिकांच्या...

सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला राजाराम पुलापासून ते फन टाईम थिएटरपर्यंतचा उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

The flyover constructed on Sinhagad Road from Rajaram Bridge to Fun Time Theater was put into service by the citizens. The second phase was opened for traffic by Chief Minister Devendra Fadnavis.

#पुणे शहरातील वाढत्या वाहनांच्या वाहतूक व्यवस्थापनासाठी सिंहगड रस्त्यावरचा तीन टप्यातला अडीच किलोमीटरचा पुल हा अत्यंत महत्वाचा असून या पुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडी मधून तर सुटका होणारच आहे. याबरोबरच प्रदूषण कमी होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांसाठी ही भेट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास, परिवहन आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आ.भिमराव तापकीर, आ. बापूसाहेब पठारे, आ. सुनील कांबळे, आ. योगेश टिळेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता, अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी, शहर मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version