
राज्याच्या समृद्ध हातमाग परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या प्रदर्शनाला दिल्ली व परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची विशेष दखल घेत शुभेच्छा संदेशाद्वारे आयोजकांचे अभिनंदन केले. राज्यातील पारंपरिक हातमाग उद्योगाला नवी संजीवनी देण्यासाठी आणि विणकरांना राष्ट्रीय स्तरावर हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे प्रदर्शन मैलाचा दगड ठरेल, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
समारोपप्रसंगी केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विणकरांशी संवाद साधला. राज्याची संस्कृती आणि पैठणीसारख्या पारंपारिक कलेला जागतिक स्तरावर पोहचविणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.