Home आरोग्य राज्यातील नागरिकांना खऱ्या आणि नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र...

राज्यातील नागरिकांना खऱ्या आणि नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमार्फत ‘नो युवर डॉक्टर’ ही क्यूआर कोड आधारित प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

1
The Maharashtra Medical Council has launched a QR code-based 'Know Your Doctor' system to ensure that citizens across the state can easily access information about genuine and registered doctors.

क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही याची माहिती तात्काळ मिळू शकते, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

विधानसभाप्रश्नोत्तरे

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निधीचा विनियोग पारदर्शक व नियमांनुसार होण्याबाबतच्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच नेत्र रोग विभागाच्या इमारतीच्या संरचनात्मक लेखापरीक्षणासाठी (स्ट्रक्चरल ऑडिट) आवश्यक शुल्क जमा करण्यात आले आहे. लेखापरीक्षणात इमारत असुरक्षित अथवा जीर्ण असल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने नवीन नेत्र रुग्णालयाची इमारत उभारण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभाप्रश्नोत्तरे

राज्यात बालविवाह रोखण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही व प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत असून पुढील पाच वर्षांत बालविवाहाचे प्रमाण १० टक्‍क्यांच्या आत आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

विधानसभाप्रश्नोत्तरे

राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. घरकुल योजनेच्या निधीबाबत कोणतीही कमतरता नसून लाभार्थ्यांच्या हप्त्यांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाहीत, अशी ग्वाही देत राज्यात पुढील एक वर्षात १५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/204743/

#पावसाळीअधिवेशन२०२६

#MonsoonSession2026