
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) आणि महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी (एमएसएसडीसी) यांच्या विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात अत्यावश्यक मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता दर्जेदार कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन तत्पर आहे. राज्यात लागू करण्यात आलेली ‘पीएम सेतू योजना’ आणि ”मुख्यमंत्री महाफंड स्वयंरोजगार योजना’ हा त्याचाच प्रमुख भाग असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रसंगी सांगितले.
महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, सोसायटीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी आनंद माळी, डॉन बॉस्को सेंटर फॉर लर्निंगचे संचालक फादर अँटोनी पिंटो आणि डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे प्राचार्य अमर प्रभू तसेच सीआयआयच्या कौशल्य विकास पॅनलचे संयोजक बॉबी कुरियाकोस उपस्थित होते.