Home महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशा ४६१ बेडची सुविधा असलेल्या नॅशनल...

जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशा ४६१ बेडची सुविधा असलेल्या नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट

The National Health Care Institute, a 461-bed facility equipped with world-class state-of-the-art medical facilities,

मध्य भारतातील अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाले.

धरमपेठ येथील नॉर्थ अंबाझरी मार्गावरील डॉ. आबाजी थत्ते सेवा अनुसंधान संस्थेच्या वतीने हा वैद्यकीय प्रकल्प सुरू होत आहे. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, सचिव शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर आदी उपस्थित होते.

नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट ही मध्य भारतातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी संस्था म्हणून सुरू होत असून २३ मजली सुसज्ज इमारत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये हेलिपॅडची सुविधा असून एअर ॲम्बुलन्सही उपलब्ध होणार आहे. अत्याधुनिक उपचारांच्या सुविधांसोबतच अवयव प्रत्यारोपण व बर्न वॉर्ड राहणार आहे. अवयव प्रत्यारोपण सुविधेवर विशेष भर दिला जाणार आहे. नॅशनल हेल्थकेअर इन्स्टिट्यूट सुमारे पाच लाख चौरस फूट क्षेत्रावर उभारले जाणार आहे. येथे मल्टीस्पेशालिटी तसेच सुपर स्पेशालिटी अंतर्गत जेरियाट्रिक रूमेट्रोलॉजी, हृदय व रक्तवाहिन्या, न्यूरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, युरोलॉजी, क्रीडा वैद्यक प्लास्टिक व पुनर्रचना आदी सुविधा राहणार आहेत. या संस्थेमध्ये पदव्युत्तर व सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी पूर्ण सुसज्ज शैक्षणिक सुविधा असतील.

error: Content is protected !!
Exit mobile version