
डिजिटलइंडिया व डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र हे जगातील डिजिटल क्षेत्रात प्रगतीशील राष्ट्रासाठी आदर्श ठरत आहे. तसेच सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले.
एआय च्या युगात डेटा सर्वात मौल्यवान ठरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला डेटा सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. सायबरसुरक्षा ही केवळ संस्थांची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सायबर कोविडपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सायबर स्वच्छतेचा अवलंब करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. अति-सामायिकरण टाळणे, समाजमाध्यमांवर जास्त माहिती न टाकणे तसेच ‘जिओस्पाय’सारख्या अल्गोरिदमपासून सावध राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (#BSE) येथे आयोजित या कार्यक्रमात सेबीचे कार्यकारी संचालक अविनाश पांडे, विविध उद्योगांचे प्रतिनिधी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.