
दिवसभरात मार्गदर्शन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, लिंग समानता तसेच सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर विविध मान्यवरांनी विचार मांडले. टॉम कूपर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर धोरणात्मक विश्लेषण सादर केले.
‘धुरंधर’ या विषयावरील चर्चेत प्रकाश बेलावडी, कर्नल अशुतोष काले आणि अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सशस्त्र दलांचा दृष्टिकोन मांडला. अमेरिका–इराण संबंधांवरील चर्चेत राजदूत टी.सी.ए. राघवन, मिन्हाज मर्चंट आणि प्रबळ दासगुप्ता यांनी सखोल विश्लेषण केले. ‘भारताची सभ्यता: अवकाश आणि काळाच्या पलीकडील प्रवास’ या सत्रात या पॅनेलमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, लेखक व कथाकार राजेश एम. अय्यर, लेखक अजय चतुर्वेदी यांनी सहभाग घेत भारतीय सभ्यतेचे सातत्य आधारांवर प्रकाश टाकला.