Home महाराष्ट्र ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०२५’ स्पर्धेचा राज्य व जिल्हास्तरीय पारितोषिक...

‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०२५’ स्पर्धेचा राज्य व जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण समारंभ प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला.

The state and district level prize distribution ceremony of the ‘Maharashtra State Excellent Public Ganeshotsav Mandal 2025’ competition was held at the Ravindra Natya Mandir in Prabhadevi, presided over by Cultural Affairs Minister Adv. Ashish Shelar.

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार महेश सावंत, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पु.ल.देशपांडे अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होत्या.

महाराष्ट्राची परंपरा असेलल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून सामाजिक सौहार्द, कला संस्कृतीचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाची व्यापकता येत्या काळात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवणार असल्याचे प्रतिपादन मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मंडळांचा पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०२५’ विजेते :

प्रथम क्रमांक : तिरंगा गणेशोत्सव मंडळ, खानापूर, जि. सांगली

द्वितीय क्रमांक : वसुंधरा वृक्षारोपी गणेशोत्सव मंडळ, जि. लातूर

त्रितीय क्रमांक : सुवर्णयोग तरुण मंडळ, पाथर्डी, जि. अहिल्यानगर

#गणेशोत्सव२०२५

error: Content is protected !!
Exit mobile version