Home महाराष्ट्र फाउंटन येथील परिवहन आयुक्त कार्यालय आता वांद्रे (पूर्व) येथे स्थलांतरित

फाउंटन येथील परिवहन आयुक्त कार्यालय आता वांद्रे (पूर्व) येथे स्थलांतरित

The Transport Commissioner's office at Fountain has now shifted to Bandra (East).

मुंबई : मोटार वाहन विभागाचे मुख्यालय असलेले परिवहन आयुक्त कार्यालय फाउंटन येथून प्रशासकीय इमारत, ४ था मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. यापूर्वी परिवहन आयुक्त कार्यालय हे ५ वा मजला, टेलिकॉम बिल्डिंग क्रमांक २, महात्मा गांधी रोड, फाउंटन, मुंबई – ४०० ००१ येथे कार्यरत होते. आता हे कार्यालय प्रशासकीय इमारत, ४ था मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ येथे स्थलांतरित झाले आहे.

या नवीन कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२२-२०८६३४०६ असून ई-मेल आयडी dycommr.inspect@gmail.com असा आहे. सर्व नागरिकांनी कार्यालयाच्या पत्त्यात झालेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक परिवहन आयुक्त (निरीक्षण) कैलास कोठावदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version