मुंबई: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देत सलामी दिली. देशभक्ती आणि उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यास श्रीमती अमृता फडणवीस, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र तसेच ‘वर्षा’ निवासस्थानातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
