राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून १ जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल.
The weather in the state has started to change and will continue to change in the week starting June 1.
सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सून च्या आगमनाची शक्यता नाही. कोकणासह प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कृषी आणि आपत्तीव्यवस्थापन विभागांकडून नागरिकांना व शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे :
शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये.
विजेच्या कडकडाटाच्या वेळी स्वतःसह व पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे.