
कार्यरत असलेल्या, रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS), ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) या समित्यांची जबाबदारी महत्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगली व परिणामकारक आरोग्य सेवा देण्यासाठी यासर्व समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या संदर्भात आयोजित बैठकीत दिले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्यसेवा दिल्या जातात. या सर्व लोकहिताच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आरोग्य समित्यांची भूमिका महत्वाची असते.
समितीमध्ये नियुक्त सदस्यांनी नियमित बैठका घेऊन स्थानिक समस्यांवर कृती आराखडे तयार करावेत. सदस्यांचे प्रशिक्षण व क्षमता बांधणी करावी तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधावा. सर्व लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य यांनी या प्रक्रियेत सहभाग घ्यावा. आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी आवश्यक सहकार्य करावे. राज्यातील सर्वांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी केले.