Home शेती केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर टोमॅटोचे घाऊक भाव कमी

केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर टोमॅटोचे घाऊक भाव कमी

केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर टोमॅटोच्या घाऊक किमतीत घट झाली आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून टोमॅटोची 90 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विक्री सुरू केली आहे

देशातील अनेक ठिकाणी जेथे टोमॅटोचे दर वेगाने वाढले आहेत त्या ठिकाणी सरकारने ही विक्री सुरू केली आहे.

टोमॅटो 80 रुपये किलो दराने सरकार विक्री करणार

देशातील 500 पेक्षा अधिक ठिकाणच्या परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर, आज रविवार 16 जुलै 2023 पासून टोमॅटो 80 रु. प्रति किलो दराने विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून नाफेड (NAFED) आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (NCCF) यांच्यामार्फत दिल्लीत आणि नोएडा, लखनऊ, कानपूर, वाराणसी, पाटणा, मुझफ्फरपूर आणि आरा या ठिकाणी ही विक्री सुरू झाली आहे. त्या त्या ठिकाणांवरील प्रचलित बाजारभावानुसार उद्यापासून अशा पद्धतीने टोमॅटोची विक्री इतर शहरांमध्ये विस्तारित केली जाईल.

ग्राहकांना दिलासा देण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version