Home नंदुरबार जिल्हा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची चिखलदरा कन्या आश्रमशाळा तसेच मुलींच्या...

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची चिखलदरा कन्या आश्रमशाळा तसेच मुलींच्या वसतिगृहास भेट

1
Tribal Development Minister Dr. Ashok Uike visits the Kanya Ashram School and girls' hostel in Chikhaldara.

अमरावती:चिखलदरा येथे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान  त्यांनी चिखलदरा दौऱ्यादरम्यान शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा तसेच टेंब्रूसोंडा मुलींच्या वसतिगृहास  येथे भेट दिली.

यावेळी भेटीदरम्यान  त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधत  महाविद्यालय व वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शिक्षणाचा दर्जा, वसतिगृहातील सुविधा आणि विद्यार्थिनींना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

याप्रसंगी आमदार केवलराम काळे, अपर आयुक्त संदीप गोलाइत, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला,  मुख्याध्यापक श्री. पुंडकर,  शिक्षकवृंद तसेच कर्मचारी उपस्थित होते.