Home शैक्षणिक पी.जी. फार्मसी कॉलेज, चौपाडे येथे रेड रिबन क्लब अंतर्गत जागतिक एड्स दिन...

पी.जी. फार्मसी कॉलेज, चौपाडे येथे रेड रिबन क्लब अंतर्गत जागतिक एड्स दिन जनजागृती कार्यक्रम संपन्न

World AIDS Day awareness program held under Red Ribbon Club at P.G. Pharmacy College, Chaupade

जागतिक एड्स दिनानिमित्त पी.जी. फार्मसी कॉलेज, चौपाडे येथे रेड रिबन क्लबच्या माध्यमातून एचआयव्ही–एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमात जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथील आयसीटीसी विभागाचे समुपदेशक श्री. तेजल माळी तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. साजिद अन्सारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना एचआयव्ही–एड्स संदर्भात सविस्तर माहिती दिली. यामध्ये एचआयव्हीचा प्रसार कसा होतो, कोणत्या मार्गांनी तो होत नाही, प्रतिबंधात्मक उपाययोजना, तपासणीची उपलब्ध साधने तसेच उपचार व समुपदेशन सेवांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या जनजागृती कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रश्नोत्तर सत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमातून मिळालेली माहिती केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता ती समाजापर्यंत पोहोचवून एचआयव्ही–एड्स प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी एचआयव्ही–एड्स जनजागृतीचे प्रतीक असलेली रेड रिबन मानवी साखळी तयार करून ‘एचआयव्ही–एड्सविरुद्ध लढा’ हा महत्त्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. या उपक्रमामुळे तरुण पिढीमध्ये आरोग्यविषयक जाणीव व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होण्यास हातभार लागला.

(WorldAIDSDay, HIVAIDSAwareness)

#RedRibbonClub#PublicHealthAwareness#YouthForHealth#StopHIV

error: Content is protected !!
Exit mobile version