Home शहादा प्राथ विद्यामंदिर परिवर्धा येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा

प्राथ विद्यामंदिर परिवर्धा येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा

1
World Tribal Day celebrated with enthusiasm at Prath Vidyamandir, Parivardha.

शहादा(प्रतिनिधी):-आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी. नटावद. ता.जि. नंदुरबार संचलित  संस्थेअंतर्गत  के. डी.गावीत.प्राथ.विद्या मंदिर, परिवर्धा ता शहादा जि. नंदुरबार येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.शीतल मोरे  यांनी केले आदिवासी समाजाची समृद्ध, संस्कृती, परंपरा, कला, शौर्य आणि सामाजिक योगदान यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सपना मोहन शेवाळे ह्या होत्या  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प सदस्य मोहन शेवाळे, सरपंच सौ सपना शेवाळे, सौ. सुरेखा शेवाळे, सोनु कोळी, सुकलाल शेलार तसेच गावातील ग्रामस्थ मंडळी यांची उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विश्व आदिवासी दिवसाचे महत्त्व स्पष्ट करताना आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती, निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि समाजाच्या विकासातील योगदाना याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पारंपरिक पोशाख, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामुळे विद्या मंदिरातील परिसरात आदिवासी संस्कृतीचा जागर आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे मनोगत शाळेचे मुख्याध्यापक  विपुल नवले यांनी आदिवासी समाजाच्या समृद्ध वारशाचे जतन करणे आणि नव्या पिढीपर्यंत तो पोहोचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्या मंदिरा च्या शिक्षिका श्रीम. शितल मोरे, श्रीम. मनीषा पाठक, श्रीम. छाया पाटील, सौ संगीता शेलार, सौ वैशाली मराठे या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विश्व आदिवासी दिवसाचा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.