
शेतीपूरक अर्थव्यवस्था निर्माण करत राज्यात पशुपालनाच्या माध्यमातून समृद्धी आणता येईल व या प्रयत्नात राज्य गोसेवा आयोगाचे मोलाचे योगदान असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा-२०२६’च्या समारोप कार्यक्रमात केले.
गोआधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्यात येईल व यातून शेतकऱ्यांना संकटात खंबीरपणे उभे राहण्याचे बळ मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या ‘गो 10’ ब्रँडचे उद्घाटन केले. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार माया ईवनाते, नागपूरच्या महापौर निता ठाकरे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा व इतर मान्यवर उपस्थित होते
पशुसंवर्धन विभाग आणि राज्य गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार माया इवनाते, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त किरण पाटील, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा आदी यावेळी उपस्थित होते.