प्रकाशा, सारंगखेडा, सुलवाडे बॅरेज तसेच हातनूर व शेळगाव धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने तापी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात जाणे टाळावे, गुरेढोरे व पंप सुरक्षित ठिकाणी हलवावेत आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता!
