
केंद्र शासनाच्या प्राणी जन्म नियंत्रण नियम, २०२३ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सर्व नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याबाबतच्या उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत म्हणाले, राज्यात एकूण १४ लाख ८० हजार भटकेश्वान असून त्यापैकी ९४ हजार श्वान मुंबईमध्ये आहेत. यावर्षी ६५ हजार श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले असून ९७ हजार ९६० श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे. मुंबईतील भटक्या श्वानांसाठी येत्या सहा महिन्यात निवारा केंद्र सुरू करण्यात येईल. यासाठी मुलुंड आणि मालाड येथे तीन हजार स्वे.फूट तर नाहुर येथे आठ हजार ४११ स्वे.फूट जागेची मागणी महसूल विभागाकडे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने सूचित केल्यानुसार पुणे, मुंबई, कल्याण डोंबिवली, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक महानगर पालिकांनी प्राणी जन्म नियंत्रण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
विविध सात धरणांमधून मुंबईला दररोज सुमारे ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात असला, तरी शहराची एकूण गरज ४,६६५ दशलक्ष लिटर इतकी आहे. ही तट भरून काढण्यासाठी मनोरी येथे उभारण्यात येणारा २०० एमएलडी क्षमतेचा खारे पाणी गोडे करण्याचा (नि:क्षारीकरण) प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईकरांच्या #पाणीटंचाई च्या समस्येतून मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.