Home नंदुरबार वनमहोत्सव २०२६-२७ ला हिरवीगार सुरुवात!

वनमहोत्सव २०२६-२७ ला हिरवीगार सुरुवात!

1
A lush green start to Vanmahotsav 2026-27!

(नंदुरबार) “**हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र**” या संकल्पनेला साकार रूप देत तसेच राज्यातील **३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाला** अधिक गती देण्यासाठी वनमहोत्सव २०२६-२७ अंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या **रोप विक्री केंद्राचे उद्घाटन** मा. **श्री. गजेंद्र हिरे**, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग, नाशिक यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

यावेळी **श्री. सुहास चव्हाण**, उपवनसंरक्षक, मेवाशी वन विभाग, तळोदा तसेच **श्रीमती लघिमा तिवारी**, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते अधिकारी, कर्मचारी तसेच **हरित सेना शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वाटप** करण्यात आले. पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा जपण्याचा संदेश देत **”एक पेड माँ के नाम”** या अभियानात प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

वनमहोत्सव कालावधीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, वृक्षप्रेमी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांना **शासनाने निश्चित केलेल्या सवलतीच्या दरात दर्जेदार वृक्षरोपे** उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून स्थानिक हवामानाला पूरक विविध प्रजातींची रोपे उपलब्ध राहणार असून, अधिकाधिक नागरिकांनी वृक्षलागवड करून हरित चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

डॉ. **मकरंद गुजर**, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, हरित सेना शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

**एक वृक्ष म्हणजे भविष्यासाठीची गुंतवणूक. चला, वनमहोत्सवाच्या निमित्ताने एक तरी वृक्ष लावूया आणि त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारीही स्वीकारूया!**

#VanMahotsav2026#HaritMaharashtra#HaritNandurbar#EkPedMaaKeNaam#TreePlantation#Environment#SocialForestry#GreenMission#Nandurbar#GoGreen#SaveEnvironment#TeamNandurbar#ClimateAction#PlantATree#GreenFuture