Home नंदुरबार जिल्हा हरित नंदुरबार कार्यशाळा २०२६ : बांबू आधारित शाश्वत विकासाची नवी दिशा!

हरित नंदुरबार कार्यशाळा २०२६ : बांबू आधारित शाश्वत विकासाची नवी दिशा!

1
Green Nandurbar Workshop 2026: A New Direction for Bamboo-Based Sustainable Development!

(नंदुरबार) सामुदायिक वनहक्क क्षेत्रांमध्ये **बांबू आधारित उपजीविका, पर्यावरण संवर्धन, वन सुशासन आणि शाश्वत ग्रामीण विकासाला** गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे **”हरित नंदुरबार कार्यशाळा २०२६”** आयोजित करण्यात आली. हा उपक्रम **मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी** आणि **मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीमती लघिमा तिवारी** यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यशाळेत **महासंचालक मनरेगा नंदकुमार वर्मा, मुख्य वनसंरक्षक गजेंद्र हिरे, पद्मश्री चैत्रामदादा पवार** तसेच आशियाई बँक, ISB आणि विविध विभागांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील **५० ग्रामसभांतील सामुदायिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CFRMC)** चे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

पद्मश्री **चैत्रामदादा पवार** यांनी ग्रामसभा सक्षमीकरण, सामुदायिक वनहक्क आणि बांबू व लघुवनोपजांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे प्रेरणादायी मॉडेल मांडले. तर **नंदकुमार वर्मा** यांनी मनरेगा व सामुदायिक वनहक्क यांचे अभिसरण करून रोजगारनिर्मिती, जलसंधारण आणि स्थलांतर कमी करण्यासाठी प्रभावी नियोजनाची आवश्यकता अधोरेखित केली.

**जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी** यांनी हरित नंदुरबार अभियानांतर्गत बांबू लागवड, विभागीय समन्वय, ग्रामसभा सक्षमीकरण आणि स्थानिक रोजगारनिर्मितीवर भर देत शाश्वत विकासाचा रोडमॅप मांडला.

ही कार्यशाळा पर्यावरण संरक्षण, वनाधारित हरित अर्थव्यवस्था, स्थानिक रोजगार आणि स्वावलंबी ग्रामविकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. **”हरित नंदुरबार”** अभियानाच्या माध्यमातून सक्षम ग्रामसभा, समृद्ध वनसंपदा आणि शाश्वत विकासाचे उद्दिष्ट अधिक बळकट झाले.

#HaritNandurbar#BambooMission#CommunityForestRights#CFRMC#SustainableDevelopment#ForestConservation#GreenEconomy#TribalDevelopment#DrMittaliSethi#Nandurbar#GreenFuture#TeamNandurbar