Home नंदुरबार जिल्हा “हातांना नवी दिशा, जीवनाला नवी आशा !”

“हातांना नवी दिशा, जीवनाला नवी आशा !”

“A new direction for the hands, a new hope for life!”

#नंदुरबार जिल्हा कारागृहात बंदीजनांनी अंगीकारला कौशल्याचा नवा वसा !

“चुकलेले क्षण बदलता येत नाहीत, पण आजचे प्रयत्न उद्याचे भविष्य नक्कीच बदलू शकतात!”

नंदुरबार जिल्हा कौशल्य विकास कार्यालय, जिल्हा कारागृह आणि जन शिक्षण संस्थान यांच्या सहकार्याने

कारागृहातील 80 सहभागींना हस्तकौशल्य प्रशिक्षण देण्यात आलं.

या प्रशिक्षणात फाईल, पेपर बॅग आणि पाकिटे तयार करत त्यांनी हाताला नवी ओळख दिली आणि एका सकारात्मक बदलाची सुरुवात केली.

समारोप सोहळ्यात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सहभागी बंदीजनांनी तयार केलेल्या कलाकुसरीचे मनःपूर्वक कौतुक केले.

त्या म्हणाल्या, “ह्या केवळ साकारलेल्या वस्तू नाहीत, तर मेहनतीने, जिद्दीने आणि आशेने गुंफलेली स्वप्नं आहेत!”

त्यांनी प्रत्येक कलाकृती डोळसपणे पाहिली, हसतमुखाने संवाद साधला आणि प्रत्येक हातामागच्या संघर्षाला, जिद्दीला आणि आत्मविश्वासाला दाद दिली.

“चुकलेली पाऊले पुन्हा नव्या वाटेवर चालू शकतात, फक्त संधीची गरज असते!”

“हा केवळ प्रशिक्षणाचा भाग नाही, तर आयुष्याच्या पुनर्बांधणीची संधी आहे, जिथे हात फक्त वस्तू तयार करत नाहीत, तर स्वतःला घडवत आहेत!

उपस्थिती:

कारागृह अधीक्षक बी.डी. श्रीराव

सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) विजय रिसे

जन शिक्षण संस्थान उपाध्यक्ष अंकुश शर्मा व कर्मचारी

“गेल्या काळाकडे पाहून दुःखी होण्यापेक्षा, नव्या सुरुवातीकडे पाहून आशावादी राहणं अधिक महत्त्वाचं!”

#NaviSuruvat#UjjwalBhavishya#HopeAndSkills#NewBeginnings#SkillForChange#Transformation#Nandurbar#कौशल्याने_संधी#नवी_उमेद#स्वावलंबनाची_नवी_दिशा

error: Content is protected !!
Exit mobile version