
यंदाचे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत असून, महिला शेतकरी विधेयकही विधिमंडळात सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी महोत्सवात महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देत त्यांच्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि विविध कृषीविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, अत्याधुनिक कृषी अवजारे, यांत्रिकीकरण, पीक व्यवस्थापन, मूल्यवर्धन आणि कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन भरविण्यात यावे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या व्यापक सहभागातून महोत्सव प्रभावीपणे राबवावा – मंत्री दत्तात्रय भरणे
बैठकीय कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषी आयुक्त सूरज मांढरे, स्मार्टचे संचालक एम. जे. प्रदीप चंद्रन, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प संचालक मीनल करनवार, कृषी संचालक रफीक नाईकवडी, अविनाश बोरकर, विनयकुमार अवटी, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व अन्य अधिकारी उपस्थित होते.