Home नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात MahaSTRIDE प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती — जिल्हा विकासासाठी धोरणात्मक बैठक

नंदुरबार जिल्ह्यात MahaSTRIDE प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती — जिल्हा विकासासाठी धोरणात्मक बैठक

Accelerating the implementation of MahaSTRIDE project in Nandurbar district — Strategic meeting for district development

स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार

मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यातील दिर्घकालीन व समतोल विकास साधण्यासाठी MahaSTRIDE (Strategic Transformation for Real-time and Inclusive Development in Economy) या जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली.

या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी District Strategic Unit (DSU) ची जिल्ह्यात लवकरच स्थापना होणार आहे.

KPMG समूहाच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा स्थानिक गरजांनुसार प्रकल्पांची निवड, नियोजन आणि अंमलबजावणी करणार आहे.

KPMG प्रतिनिधींनी प्रकल्पाचे सादरीकरण करताना जिल्हा विकासासाठी महत्त्वाच्या बाबी मांडल्या.

बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली:

एक तालुका, एक क्लस्टर या संकल्पनेखाली स्थानिक संसाधनांवर आधारित औद्योगिक विकास

स्टोरेज फॅसिलिटीची उभारणी – शेती आणि उत्पादन क्षेत्रासाठी आवश्यक सुविधा

महिला सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम

स्थानिक उद्योग वाढवण्यासाठी धोरणात्मक पाठबळ

पर्यटनस्थळांचा विकास – रोजगार व आर्थिक वाढीस चालना

जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते.

मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले की, “MahaSTRIDE हे केवळ शासकीय प्रकल्प न राहता जिल्ह्याच्या भविष्याचा पाया घालणारे धोरणात्मक अभियान ठरेल.”

#MahaSTRIDE#KPMGIndia#DistrictStrategicUnit#NandurbarDevelopment#SmartPlanning#OneTalukaOneCluster#WomenEmpowerment#TourismGrowth#StorageInfrastructure#डॉमित्तालीसेठी#NandurbarCollector#नंदुरबारविकास

error: Content is protected !!
Exit mobile version