Home नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात MahaSTRIDE प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती — जिल्हा विकासासाठी धोरणात्मक बैठक

नंदुरबार जिल्ह्यात MahaSTRIDE प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती — जिल्हा विकासासाठी धोरणात्मक बैठक

2
Accelerating the implementation of MahaSTRIDE project in Nandurbar district — Strategic meeting for district development

स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार

मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यातील दिर्घकालीन व समतोल विकास साधण्यासाठी MahaSTRIDE (Strategic Transformation for Real-time and Inclusive Development in Economy) या जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली.

🔹 या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी District Strategic Unit (DSU) ची जिल्ह्यात लवकरच स्थापना होणार आहे.

🔹 KPMG समूहाच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा स्थानिक गरजांनुसार प्रकल्पांची निवड, नियोजन आणि अंमलबजावणी करणार आहे.

🔹 KPMG प्रतिनिधींनी प्रकल्पाचे सादरीकरण करताना जिल्हा विकासासाठी महत्त्वाच्या बाबी मांडल्या.

बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली:

एक तालुका, एक क्लस्टर या संकल्पनेखाली स्थानिक संसाधनांवर आधारित औद्योगिक विकास

स्टोरेज फॅसिलिटीची उभारणी – शेती आणि उत्पादन क्षेत्रासाठी आवश्यक सुविधा

महिला सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम

स्थानिक उद्योग वाढवण्यासाठी धोरणात्मक पाठबळ

पर्यटनस्थळांचा विकास – रोजगार व आर्थिक वाढीस चालना

🔸 जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते.

मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले की, “MahaSTRIDE हे केवळ शासकीय प्रकल्प न राहता जिल्ह्याच्या भविष्याचा पाया घालणारे धोरणात्मक अभियान ठरेल.”

#MahaSTRIDE#KPMGIndia#DistrictStrategicUnit#NandurbarDevelopment#SmartPlanning#OneTalukaOneCluster#WomenEmpowerment#TourismGrowth#StorageInfrastructure#डॉमित्तालीसेठी#NandurbarCollector#नंदुरबारविकास