अंतर्गत योजना: पिकांवरील किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प योजना (2025-26)
महिला शेतकरी गटांसाठी कापूस पिकाचे आधुनिक आणि एकात्मिक व्यवस्थापन समजावून सांगण्यासाठी माँ रेवा शेतकरी गटासाठी विशेष शेतीशाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम तालुका कृषी अधिकारी श्रीमती एम. के. वळवी व मंडळ कृषी अधिकारी श्री वि.एच. निकुम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
शेतीशाळेची सुरुवात शेतकरी प्रतिज्ञा घेऊन आणि ICM (एकात्मिक पिक व्यवस्थापन) साठी टाळी वाजवून करण्यात आली.
श्री गणेश सोनवणे (उप कृषी अधिकारी, सोमवाल-2) यांनी एकात्मिक पद्धतीने कापूस पीक कसे व्यवस्थापित करावे, खतांचे संतुलित व्यवस्थापन, माती परीक्षणाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
1. किटकनाशक फवारणी करताना “करावं – करू नये” यावर दृश्य माध्यमाद्वारे प्रात्यक्षिक
2. दशपर्णी अर्काचे प्रात्यक्षिक प्रगतशील शेतकरी श्री. मान्या गुंजाऱ्या पावरा यांनी सादर केले.
श्रीमती स्वाती गावीत (सहाय्यक कृषी अधिकारी) यांनी CESA (Cotton Ecosystem Specific Approach) संकल्पना समजावून सांगताना, पोस्टर चित्रण व निरीक्षणासह कापसाचे संपूर्ण परिसंस्थात्मक ज्ञान दिले.
शेतकरी सन्मान व संवाद:
⦁ सर्व सहभागी शेतकरी महिलांना शेतीशाळा किट (पेन, पेन्सिल, नोटपॅड, फाईल इ.) वाटप करण्यात आले.
⦁ शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सहभागी महिला शेतकरी:
श्रीमती ज्योती पावरा, कालीबाई पावरा, दुर्गा पावरा व इतर महिला शेतकरींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या उपक्रमामुळे:
#महिला_शेतीशाळा#CottonICM#nandurbaragriculture#SustainableFarming#ShetiShala2025#organicsheti#farmertraining#cottonmanagement
