Home शेती कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी, अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सत्कार

कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी, अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सत्कार

1
Agriculture award-winning farmers and officials felicitated by the District Collector.

वर्धा : कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व मार्गदर्शक कार्य करणाऱ्या प्रयोगशील शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांना दरवर्षी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सन 2023 आणि सन 2024 च्या विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांमध्ये जिल्ह्याला तब्बल पाच पुरस्कार जाहीर झाले आहे. या पुरस्कार्थींचा जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

सन 2023 चा युवा शेतकरी पुरस्कार पवनी येथील युवा प्रयोगशील महिला शेतकरी प्रतिभा प्रमोद महाजन यांना नाविण्यपूर्ण प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबाबत तसेच उप कृषि अधिकारी मनोज झिबलराव गायधने यांनी प्रशासकीय सेवेत असतांना शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचविल्याबद्दल शासकीय श्रेणीतील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे.

सन 2024 च्या पुरस्कारासाठी सेलू तालुक्यातील आमगाव मदनी येथील शेतकरी नंदकिशोर किसनराव गावंडे यांना कृषिभुषण पुरस्कार, पवनार येथील युवा शेतकरी प्रांजल विठ्ठलराव वाघमारे यांना युवा शेतकरी पुरस्कार व सेलू तालुक्यातील आमगाव मदनी येथील शेतकरी अभय निळकंठराव ढोकणे यांना त्यांच्या शेतीतील निष्ठा आणि प्रयोगांसाठी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कारांमुळे जिल्ह्यातील युवा शेतकऱ्यांना तसेच कृषी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे, असा विश्वास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी व्यक्त केला आहे. जाहिर झालेल्या पुरस्काराचे वितरण दिनांक 1 जुलै रोजी राज्यपालांच्या हस्ते मुबंई येथे होणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.