
आरोग्य विभागाशी संबंधित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत तसेच सर्व कामांना गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आढावा बैठकीत दिले.
बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन, ५० खाटांच्या नशामुक्ती केंद्राची उभारणी, विविध आरोग्य संस्थांमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर लेबर रूम आणि अन्य अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून दर्जोन्नती, सेलू येथे अत्याधुनिक कॅथलॅब स्थापन करणे तसेच परभणी जिल्हा रुग्णालय, येथे रोबोटिक सर्जरी सेवा उपलब्ध करून देणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.