मोटारसायकल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
नंदुरबार जिल्हा पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेऊन उल्लेखनीय कारवाई केली आहे. या कारवाईत चोरीच्या 21 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ₹7 लाख 50 हजार आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील 06 गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात आली आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
नंदुरबार जिल्हा पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असून गुन्हेगारीविरोधातील कारवाई पुढेही अशाच प्रभावीपणे सुरू राहील.
आपले सहकार्य – आमची जबाबदारी
नंदुरबार जिल्हा पोलीस – सदैव आपल्या सेवेत!
